भुसावळात रस्ता सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी- शिवसैनिकांचे तहसीलमध्ये घेराव

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गा दरम्यान शहराला लागून ७ किलोमीटर मार्गावर सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याने या मार्गावर अजूनही अनेक बळी जात असल्याने भुसावळ शिवसेनेने भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात घेराव घातला आहे.

शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, विभागप्रमुख हर्षल चौधरी, विभागप्रमुख सचिन चौधरी, बाळा ढाके, अमोल पाटील यांनी प्रकल्प अभियंते सुजानसिंह यांना २६ फेब्रुवारी रोजी भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात घेराव घातला. रस्ते अपघात होऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या वर्षभरात शहरातील रस्त्यांवर खूप अपघात होऊन अनेक जणांचे बळी गेले आहेत. कार, मोटारसायकल व इतर वाहनांमध्ये अपघात होऊन प्रसंगी मृत्यू होतो. त्यात दुचाकीवरील मृत्यूची संख्या जास्त आहे. अपघातात दुचाकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हे वाढते अपघात चिंतेची बाब आहे त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा मार्ग या रस्त्यांचे जाळे भुसावळ शहरात जास्त आहे. त्यात काही रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे, तर काही महामार्ग अरुंद आहेत. गेल्या काही वर्षांपासून वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. चौपदरीकरण सुरू असल्याने व शहरात सर्वाधिक मार्ग असल्याने अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. कंटेनरसारखी वाहने रस्त्यावर बंद पडल्यानंतर रस्त्यावरच उभी केली जातात. हॉटेल, धाब्यांवर थांबण्यासाठी कंटेनरचालक वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. रात्रीच्या वेळी हे कंटेनर न दिसल्यास त्यावर इतर वाहने आदळून अपघात होतात राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच चौपदरीकरणाचे काम करणारी कंपनी यांनी याबाबत खबरदारी घ्यावी व सुरक्षा वाढवावी अशी मागणी बबलू बऱ्हाटे व शिवसैनिकांनी केली.

Protected Content