रत्नापिंप्री येथील शेतकऱ्यांचे विजवितरणला विविध मागण्यांचे निवेदन

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील रत्नापिंप्री येथे शेती परीसरात केला जाणारा विजपुरवठा आणि आता वाढीव शेती परीसरात देखील विज देण्यासंदर्भात विरोध करीत रत्नापिंप्री येथील शेतकऱ्यांनी आज विज वितरण कंपनीच्या पारोळा अभियंता यांना निवेदन दिले.

यात निवेदनात म्हटले रत्नापिंप्री सबटेशन वरून शेती परीसरात केलेले विभाजन हे आतापर्यंत ठिक असले तरी अनेक समस्या ज्या कमी दाबाचा विजपुरवठा, डिपी परत परत जळणे, केबल जळणे, अनेक डीप्यावर जास्तीचे कनेक्शन देण्यात आले आहेत तरी ही रात्री अपरात्री शेतकरी फेज, डीओ आदी इलेक्ट्रीक कामाकरीता जीव धोक्यात घालून काम करत असतात अशा वेळी ही याच समस्या असतांनाच आपल्या लेव्हलवरून पुन्हा या सबटेशनवरून इतर शेती विभाग वाढवून या व्यतिरिक्त वाढीव शेती परीसरात विजपुरवठा जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु आहे तेवढाच भार जास्त आहे. वाढीव भाग जोडल्यास यांचा जास्तच त्रास सहन करावा लागणार आहे. तरी संबंधित विभागाने रत्नापिंप्री सबटेशनच्या शेती परीसरातील वाढीव भागाकरीता विजेची जोडणी करू नये जोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
यावेळी निवेदन उपकार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांना देण्यात आले. यावेळी तुकाराम पाटील, रामकृष्ण पाटील, उपसरपंच सुरेश पाटील, मयुर पाटील, किशोर वाघ, शरद पाटील, किरण पारधी, पंकज पाटील, पांडुरंग भिल, सुरेश पाटील, सतिश गोसावी, कैलास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, दिलिप कुंभार, एकनाथ पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र पाटील, रत्नापिंप्री , दबापिंप्री, होळपिंप्री येथिल शेतकरी उपस्थित होते.

Protected Content