Home Cities एरंडोल एरंडोल शहरातून अल्पवयीन मुलीला पळविले; एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एरंडोल शहरातून अल्पवयीन मुलीला पळविले; एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
29


 

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील गांधीपुरा या भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात बुधवार २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल शहरातील गांधीपुरा भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० डिसेंबर रोजी रात्री १० वाजता अल्पवयीन मुलगीसह घरातील सर्व सदस्य जेवण करून झोपलेले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आले. हा प्रकार २१ डिसेंबर रोजी सकाळी ३ वाजता लक्षात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ती कुठेही मिळून आली नाही. अखेर मुलीच्या नातेवाईकांनी एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार २१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल करीत आहे.


Protected Content

Play sound