राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पाचोऱ्यात जनजागृती रॅलीचे आयोजन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा भडगाव ग्राहक सेवा संघाच्या वतीने शनिवारी २४ डिसेंबर रोजी ग्राहक दिन साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता शहरातील हुतात्मा स्मारक येथुन विद्यार्थी व विद्यार्थीनींची “जागो ग्राहक जागो” रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता हुतात्मा स्मारकात पाचोरा – भडगाव ग्राहक सेवा संघाचे सह सचिव राधा शर्मा, सल्लागार विलास जोशी, डॉ. संजय माळी, गोपाल पटवारी हे ग्राहकांना मार्गदर्शन करणार आहेत. भारतात २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास करण्यात आला. भारतीय संसदेने पास केलेला ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा कायदा हिताचा असुन ग्राहकांसाठी वरदान ठरणारा आहे.

या कायद्याने ग्राहकांना न्याय मिळण्यास मदत होते. या कायद्याचे वैशिष्ट्ये व महत्व, ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्ये, जिल्हा ग्राहक निवारण आयोग, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग यांची माहिती व्हावी. ग्राहकांचे प्रबोधन व ग्राहक जागृती यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पाचोरा – भडगाव ग्राहक सेवा संघाच्या अध्यक्षा मंगला शिंदे, सरचिटणीस प्राचार्य डी. एफ. पाटील, पाटील, कार्याध्यक्ष आर. पी. बागुल, प्रा. एल. बी. शर्मा, लता शर्मा, उपाध्यक्ष विनोदराय मोदी, आनंद नवगिरे, कैलास अहिरे, सह सचिव अब्बास कपासी, अशोक महाजन, माया सुर्यवंशी, उज्वला महाजन, शिला पाटील, सल्लागार डॉ. स्वप्निल पाटील, अॅड. एस. एफ. पाटील, शेख खलील शेख नुरा, जयदेव पाटील, एकनाथ सदनशिव, डॉ. विकास केजरीवाल, डॉ. अर्चना पाटील, सतपाल परदेशी, राजेश धनराळे, योगेश पाटील, दिलीप शिरुडे, कैलास राठोड हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पाचोरा – भडगाव ग्राहक सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content