एरंडोल प्रतिनिधी । शहरातील साईनगर भागातील बंद घर अज्ञज्ञतचोरट्यांनी फोडून घरातील ४ हजारांची रोकड आणि सोन्याची मंगलपोत असा एकुण ४४ हजारांचा मुद्देमाला चोरून नेला आहे. एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मनिषा पाटील रा. साई नगर यांचे घर आहे. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून कामाच्या निमित्ताने ते तालुक्यातील बामणे येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घरी आले असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी एरंडोल पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी येवून चोरीचा पंचनामा केला. महिलेचे मावससासरे राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.