दिपनगर येथे डोक्याच्या गंभीर दुखापतीत एकाचा मृत्यू

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र समोरील पुलाखाली एकाला डोक्याला मार लागून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मयताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले आहे. मयत व्यक्ती निंभोरा मधील स्थानिक असल्याची माहिती मिळाली आहे. दिपनागर औष्णिक विद्युत केंद्र समोरील पुलाखाली  मयत गजानन आनंदा खंडारे (वय ४५ रा. निंभोरा ता. रावेर) येथील इसमांची आज सकाळी मृतदेह आढळून आल्याची स्थानिक व्यक्तींकडून माहिती मिळाली. डोक्याला मार लागून पाण्यात बुडून मयत झाले असेल असा प्राथमिक अंदाज आहे.

यावेळी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि रुपाली चव्हाण, पोना प्रेमचंद सपकाळे, पोहेकॉ श्यामकुमार मोरे, पोकॉ विशाल विचवे आदी उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.