भामरे बुद्रुक येथील अंगणवाडी सेविकेचा मोबाईल चोरट्याने लांबविला

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भामरे बुद्रुक येथील अंगणवाडीसेविका यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांने ६ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेल्या फिर्यादीनुसार, तालुक्यातील भामरे बुद्रुक येथील मनिषा दिनेश पाटील अंगणवाडी सेविका आहेत. त्या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांना शासकीय मोबाईल वापरण्यास देण्यात आले आहे. रविवारी २५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याचे  उघड झाले आहे. परिसरात शोधाशोध करून मोबाईल अद्याप पावेतो मिळून आला नाही. मनिषा पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   मणिषा दिनेश पाटील यांनी भादवी कलम ४५४ व ३८० प्रमाणे आज अज्ञात इसमाविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शंकर जंजाळे हे करीत आहेत.

Protected Content