एरंडोल प्रतिनिधी । शहरातील न्यु लक्ष्मी नगरातील युवकांनी संक्रांती निमित्त परिसरातील गटारींची स्वच्छता करून आगळावेगळा उपक्रम राबविला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मकर संक्रांती निमित्त काही तरी नवीन करावे या हेतूने तरुणांनी ते स्वतः राहत असलेल्या न्यू लक्ष्मी नगर या ठिकाणी नवीन वसाहत असल्याने त्याठिकाणी अजुन गटारी नसल्याने गटारीचे पाणी हे इतरत्र अस्ताव्यस्त पसरत होते.त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते.त्या परिसरात राहणारे युवक कृष्णा ओतारी व मित्र परिवाराने स्वखर्चाने जेसीबीच्या साह्याने सदर गटारी स्वच्छ केल्या व स्वच्छता अभियान राबवले. यामुळे नागरिकांना होणारा त्रास काही सा कमी झालेला आहे.आजच्या युगात युवकांनी केलेल्या केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल न्यू लक्ष्मी नगरातील रहिवाशांनी व शहरातील रहिवाशांनी कौतुक केले.
सदर उपक्रमात तेजस पिंगळे, सागर सोनवणे, ज्ञानेश्वर सपकाळे, गौरव महाले, प्रमोद राजपूत, जगदीश चौधरी, रनवीर राजपूत, प्रशांत माळी, साहिल गांगुर्डे, राहुल राजपूत, पंकज मराठे, हेमंत सोनार, सचिन सोनवणे, दत्तराज वाघ, सनी राजपूत, महेंद्र मराठे, विशाल मिस्त्री, राहुल पाटील, सागर शिंदे आदी युवकांनी सहभाग नोंदविला.