जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील गिता इंडस्ट्रीजमधून अल्यूमिनीअमचे कॉईल आणि केबल वायरचे बंडल चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला सुप्रिम कॉलनीतून अटक केली आहे. तर दुसरा फरार झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी सेक्टर मधील ई-३२ मध्ये असलेल्या गीता इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत इलेक्ट्रिक वायर बनवण्याची कंपनी आहे. दरम्यान १९ जुलै मध्यरात्री कंपनी बंद असतांना संशयित आरोपी संतोष मोहन चव्हाण रा. सुप्रीम कॉलनी याने कंपनीचे शटरचे लॉक तोडून कंपनीतून ५९ हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे कॉइल आणि सर्व्हिस वायरचे बंडल असा मुद्देमाल चोरून नेले होते. याबाबत कंपनीचे मालक राहुल प्रताप गुरुनानी रा. गायत्री नगर, शिरसोली रोड जळगाव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील संशयित आरोपीला सुप्रिम कॉलनीत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळकसर, सुधीर सावळे, इम्रान अली सैय्यद, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, सतिष गर्जे यांनी संतोष मोहन चव्हाण (वय-५५) रा. पांडे किराणा समोर, सुप्रीम कॉलनी याला अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.