जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा एनएसयुआय वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस भवन समोर बिहार निवडणुकीच्या भाजप पक्षाच्या जाहीरनाम्याच्या पत्रांची म्हणजेच “जुमला पत्राची” होळी करून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला गेला.
भाजप पक्षाच्या वतीने बिहार राज्याच्या निवडणुक जाहीरनाम्याची प्रसिद्धी काल करण्यात आली. जाहीरनाम्यामध्ये भाजप पक्षाने देशातील जनतेच्या भावनांचा खेळ करणारा म्हणजेच बिहार राज्यात जर भाजपाची सत्ता आली तरच तेथील जनतेला केंद्र सरकारच्या वतीने कोरोना लसीचे मोफत वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.याचा निषेध करण्यासाठी आज एनएसआययुतर्फे भाजपचा जाहीरनामाची काँग्रेस भवन येथे होळी करण्यात आली. यावेळी मोदी सरकार व भाजप विरोधी घोषण्या देण्यात आल्या.
दरम्यान , बिहार राज्यात सत्ता आली तरच कोरोनाची लस मोफत दिली जाणार मग बिगर भाजपशासित राज्यांमध्ये केंद्र सरकार कोरोना लसीचा वाटप करणार नाही का..? असा प्रश्न जळगाव जिल्हा हा एनएसयुआयच्या वतीने केंद्र सरकारला विचारण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकीर बागवान, महेंद्रसिंग पाटील, कपिल पाटील, दीपक सोनवणे, शब्बीर शेख,जाकीर शेख, भरत ललवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते