शाहूनगरात चाकूचा धाक दाखवत गल्ल्यातील ५ हजाराची रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहूनगर येथे सिगारेट मागण्याच्या वादातून एकाने दुकानदाराला बेदम मारहाण करून चाकूने वार करून जखमी केले व गल्ल्यातील ५ हजाराची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मुजमिल शेख इब्राहिम (वय-२१) रा. शाहु नगर यांचे शाहुनगर परिसरात यांचे किरकोळ विक्रीचे दुकान आहे. ९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून दुकानाजवळील कचऱ्या विल्हेवाट लावता संशयित आरोपी शेख अल्तमस उर्फ सत्या शेख शाकील (वय-१९) रा. इंदिरानगर, शाहु नगर हा दुकानजवळ येवून सिगारेट मागितले. दरम्यान टपरीधारकाने दुकान बंद केल्याचे सांगितल्याने त्याचा राग आल्याने शेख अल्तमस याने मुजमिल याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच चाकूने वार करून गल्ल्यातील ४ ते ५ हजार रूपयांची रोकड जबरी हिसकावून पळ काढला. टपरीधारक मुजमिल शेख इब्राहिम यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपी अल्तमश याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि गणेश बुवा करीत आहे.

Protected Content