एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ — राहुल गांधी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असं ट्वीट आज पुन्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत त्यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला आहे.

 

कोरोनाच्या उपलब्ध मात्रा आणि जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली यांचा कुठेही तालमेल लक्षात ठेवला नसल्याचा संदर्भ राहुल गांधी यांनी घेतला आहे.

 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रोजच ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचं ते वारंवार सांगत आहेत. राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण सोडत असल्याने सत्ताधारी भाजपाही त्याला प्रत्युत्तर देत आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान अहंकारी असल्याचा अप्रत्यक्ष टोला हाणला आहे.

 

Protected Content