जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते आमदार एकनाथराव खडसे यांची विधान मंडळाच्या तीन समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सन २०२३ – २०२४ या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी नियुक्त्या जाहीर केल्या असून, महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या लोक लेखा समिती, अनुसूचित जमाती कल्याण समिती व कामकाज सल्लागार समिती सदस्यपदी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार एकनाथराव खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.