कुसुंबे खुर्द येथे जनावरांचे लसीकरण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात जनावरांना लंपी आजाराचा संसर्ग होवू  नये याकरिता  कुसुंबे खु येथे गाय व बैल यांचे लसिकरण करण्यात आले.

 

लंपी या जिवघेण्या आजारापासून गाय व बैल यांचे सरक्षंण व्हावे.  तसेच पहिलेच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवाना दिलासा मिळावा याकरिता गाय व बैल याचं लसीकरण आज. शुक्रवार दि.  १६ सप्टेंबर रोजी करण्यात आले.  हे लसीकरण  नियोजनबध्दरित्या  डॉ.  योगेश पाटील, गोपाल शेळके, प्रतिक घुगे , मनोज पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे , वसंत पाटील, शिवाजी पाटील  सर्व ग्रामपंचायत सदस्य व  कर्मचाऱ्यांसह आदींनी  करवुन घेतले.  त्यावेळी समस्त शेतकऱ्यांकडुन प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

Protected Content