एकतर्फी व जिल्हा बाहेर शिक्षकांची बदली करू नका – मुस्लिम शिष्ट मंडळाची मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सदर बदल्या करताना शिक्षकांऐवजी शिक्षक मिळत नाही तो पर्यंत एकतर्फी व जिल्हा बाहेर शिक्षकांची बदली करू नका, अशी मागणी मुस्लिम शिष्ट मंडळातर्फे आयुक्त मनपा डॉ. विद्या गायकवाड यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या १० प्राथमिक व २ माध्यमिक शाळांमध्ये १८ शिक्षकांची संख्या कमी असून नुकत्याच शासनाच्या धोरणानुसार इतर जिल्ह्यातील शिक्षक जे जळगाव मनपा व जिल्हा परिषद मध्ये नोकरीला लागलेले आहेत ते आपल्या मूळ जिल्ह्यात अथवा इतर जिल्ह्यात जाऊ इच्छिता त्यांच्या बदल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद चे अंतर्गत केल्या जात आहेत. परंतु सदर बदल्या करताना शिक्षकाऐवजी शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शिक्षकांची बदली करू नका.

कारण अगोदरच कमी असलेले शिक्षक व त्यात एकतर्फी बदलीमुळे पुन्हा त्यात भर पडली जात आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिक्षक कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे व हळूहळू महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा बंद होत आहेत.

खाजगी शाळांची मनमानी

खाजगी शाळा या केजी, पाचवी, सातवी, अकरावी या वर्गात प्रवेश घेताना मोठ्या प्रमाणात प्रवेश फी व डोनेशन घेत आहे. परंतु त्याची रीतसर पावती सुध्दा देत नाही, त्यामुळे ज्या काही सामाजिक संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खाजगी शाळेला चेक देउ इच्छीत आहे ते चेक शाळा घेत नसल्याने विद्यार्थ्यांचे गळती सुरू झालेली आहे.

एकतर्फी बदली करू नका अन्यतः तीव्र आंदोलन

मनपा अथवा जी.प. येथून एकतर्फी जिल्हा बाहेर शिक्षकांची बदली करू नका, अशी मागणी जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, ज्येष्ठ उर्दू पत्रकार अली अंजुम रिझवी, स्वातंत्र सेनानी मीर शुक्रल्ला प्रतिष्ठानचे मीर नाजीम अली यांनी आयुक्त मनपा डॉ. विद्या गायकवाड यांना प्रत्यक्ष भेटून केलेली आहे.

तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग मनपा जळगाव यांना सुद्धा दिलेल्या आहेत.

 

Protected Content