Home क्राईम शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

0
41

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर शिवारात शेतात गुरे चरणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करून परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय शांताराम धनगर रा. निमगाव ता.जि. जळगाव हा तरुण आपल्या आई-वडील यांच्यासह वास्तव्याला आहे. रविवार 13 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता विजय हा संजय माधव शिरुडे यांच्या शेतात गुरे चारत होता. याबाबत राग आल्याने संजय माधव शिरुडे, प्रमोद रवींद्र शिरुडे, गिरीश संजय शिरुडे, गणेश संजय शिरुडे सर्व रा. निमगाव ता. जि. जळगाव यांनी हातातील कुऱ्हाडीच्या दांडक्याने विजय याचे वडील शांताराम धनगर यांच्या डोक्यात टाकला. त्यानंतर विजय आणि त्याची आई कविता यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता शांताराम धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय माधव शिरुडे, प्रमोद रवींद्र शिरुडे, गिरीश संजय शिरुडे, गणेश संजय शिरुडे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदसर काझी करीत आहे.


Protected Content

Play sound