सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल वैष्णवी काबराचा सत्कार

पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये सी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा वैष्णवी काबरा यांचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन विलास जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विलास जोशी यांनी वैष्णवी हिस सन्मानित करतांना शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी देखील तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तम यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. वैष्णवी काबरा यांचे वडील मनिष काबरा आणि आई वैशाली काबरा यांचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन. आर. पाटील, आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, महेश कौंडिण्य, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी देखील वैष्णवी काबरा हिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Protected Content