जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात एका तरुणाचा ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवार ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इमरान साकिदात खान (वय-३०) रा. भोईटे नगर, रेल्वेगेट जवळ, पिंप्राळा, जळगाव हा तरुण हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. ४ जानेवारी रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास इमरान खान हा जळगाव शहरातील उस्मानाबाद परिसरात असताना रुपेश ईश्वर पाटील (वय-२५) रा. चिनावल ता. रावेर याने ६ हजार किमतीचा इमरानचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी बुधवारी ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रुपेश ईश्वर पाटील यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाही योगेश पाटील करीत आहे.