जळगावातील शाहू कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी चोरी करून दुकान पेटविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहूनगर परिसरात आलेल्या शाहूनगर कॉम्प्लेक्समध्ये भाटीय आईस्क्रिम व कोल्ड्रींक्स दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून आत प्रवेश करत चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. चोरटे एवढ्यावरच न थांबता त्यांनी चोरी केल्यानंतर दुकानातील सामान पेटवून दिला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

दुकानदाराकडून मिळालेली माहिती अशी की, सुरेंद्र नवनीतलाल भाटीया (वय-६२) रा. सुयोग अपार्टमेंट, हरेश्वर नगर, रिंगरोड यांचे शाहूनगरातील शाहूनगर कॉम्प्लेक्समध्ये भाटीया आईसस्क्रिम व कोल्ड्रींक्सचे दुकान आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने त्यांचे दुकान २३ मार्च पासून बंदावस्थेत होते. अधूनमधून ते दुकानाकडे पाहणी करून जात होते. गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश करत चॉकलेट, कोल्ड्रींक्स व बिस्किटांची चोरी केली.

दुकानातच प्यायले दारू व दुकान पेटविले
अज्ञात चोरट्यांनी शटर उचकावून आत प्रवेश करत कोल्ड्रींगच्या फ्रिजमधून बिसलरी पाण्याची बाटली काढून दारू प्यायले. यावेळी दुकानातच सिगारेट ओढली. घटनास्थळी दारूची व पाण्याची बाटली सोडून दिली. दुकानातील वरच्या मजल्यावर असलेल्या सामानाला आग लावून पेटवून दिली. यात कोल्ड्रींगच्या बाटल्या काही कागदाचे खोके, कुलरसह आदी सामान जळून खाक झाला आहे.

गुरूवारी मध्यरात्री आग लागल्यानंतर चोरटे पसार झाले. पहाटे पाच वाजेच्या सुमारास मेनरोडवर राहणारे ॲड. मंगेश सरोदे यांनी दुकानमालक सुरेंद्र भाटीया यांना फोनवरून दुकानातून धुर निघत असल्याचे सांगितले. भाटीया यांनी दुकानावर येवून पाहणी केली असता दुकाना चोरी व दुकानाला आग लागलेली होती. त्यांनी तातडीन महानगरपालिकेच्या बंबाला बोलवून आग विझविण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Protected Content