भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बालविकास प्राथमिक विद्यामंदीर येथील शाळेचे उपशिक्षक सागर महाजन यांना जळगावातील मौलाना आझाद फाऊंडेशनच्यावतीने भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मौलाना आझाद फाऊंडेशन संस्थेतर्फे कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन जळगाव येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मनोज पाटील यांनी भूषविले. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, मौलाना आझाद फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख, इकरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार, श्री स्वामी समर्थ गृपच्या संचालिका तथा श्री स्वामी समर्थ विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका, नोबेल स्कूलच्या चेअरमन अर्चना सुर्यवंशी, अँड खलील देशपांडे, जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी विजय परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे, भारतीताई मस्के, श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर, आव्हाने शिवार शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, छाया केळकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका डॉ. पाकिजा पटेल उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सागर विलास महाजन यांना मौलाना आझाद फाऊंडेशनच्या सदस्य पूजा अवधूत कासार यांच्या समवेत पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.