उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या मदतीने; ‘एक आठवण आपल्या दारी’ उपक्रमास प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी | उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या मदतीने शहरातील तरूणांच्या ग्रुपने ‘एक आठवण आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. यात शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाची आपत्ती सुरू आहे. यातील दुसरी लाट ही शिखरावर असतांना मुकेश पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जळगावातील कोविड स्मशानभूमित विनामूल्य सेवा केली. याबाबत त्यांच्या कार्याचा ठिकठिकाणी गौरव देखील करण्यात आला आहे. 

दरम्यान, याच कामाला पुढे नेण्यासाठी मुकेश पाटील आणि त्यांच्या मित्रांनी आता एक आठवण आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. यात कोविडमुळे दगावलेल्या रूग्णाच्या आप्तांनी त्यांची आठवण म्हणून किमान एक वृक्ष लाऊन त्याची लागवड करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी या उपक्रमासाठी मदत केली आहे.

दरम्यान, या उपक्रमाच्या अंतर्गत आज जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमित वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी मुकेश पाटील, विकास वाघ,गिरीश धांडे, करण मालकर,अमोल बावणे, मुकेश सावकारे , स्मशानभूमीतील कर्मचारी धनराज सपकाळे,काशीनाथ बिर्‍हाडे आदींनी सहकार्य केले. याच प्रमाणे आता स्मशानभूमिसह ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मुकेश पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, वृक्षांच्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन होत असून याचा पर्यायाने आपल्या सर्वांना लाभ होणार आहे. एक आठवण आपल्या दारी हा जनहिताचा उपक्रम असून यात जळगावकरांनी सहभागी होण्याचे आवाहन उपमहापौरांनी याप्रसंगी केले.

Protected Content