जळगाव, प्रतिनिधी । कोरोना काळामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय महापालिकेने अधिग्रहित करून कोविड सेंटर सुरु केले होते. आता शहरात कोविड रुग्णाची संख्या नगण्य असल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. मात्र, लवकरच महाविद्यालय सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर सुनील खडके यांच्या निर्देशानुसार महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांना कोरोणाचा कोणताही धोका उद्भवू नये यासाठी महाविद्यालय व परिसर सॅनिटायझ करण्यात आले.
कोरोणाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने जनजीवन सुरळीत होत आहे. यानुसार शासनाने शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमहापौर श्री. खडके यांना विद्यार्थ्यांना कुठलाही प्रकारचा बाधा होऊ नये यासाठी महाविद्यालय सॅनिटाईज करून देण्याची विनंती केली होती. यानुसार उपमहापौरांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यानंतर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कोविड सेंटर म्हणून उपयोगात आणलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संपूर्णपणे सॅनिटाईज करण्याच्या सूचना केल्यात. यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उपमहापौर सुनील खडके यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य सी. पी. भोळे, प्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, प्रा. एम. व्ही. इंगळे, प्रा. सी. पी. भोळे, प्रभारी अधिकारी उपयोगिता शास्त्रज्ञ प्राध्यापक एम. आर. पाटील, डॉ. पी. व्ही. चौधरी, ए. डी. विखार, प्रा. पी. पी. चौधरी, हर्षल नेमाडे आदीं याप्रसंगी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/509100163388454