जळगाव जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची नावे

logo

 

जळगाव प्रतिनिधी । संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काल गुरूवारी लागला. राज्यात शिवसेना-भाजप युतीला सहज विजय मिळेल असे वाटत असताना देखील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला या निवडणूकीत चांगले यश मिळाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील विजयी उमेदवाराची नावे पुढीलप्रमाणे –
अमळनेर येथे अनिल पाटील, राष्ट्रवादी; एरंडोल – चिमणराव पाटील, शिवसेना; चाळीसगाव – मंगेश चव्हाण, भाजप; चोपडा – लताबाई सोनावणे, शिवसेना; जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, शिवसेना; जळगाव शहर – सुरेश भोळे, भाजप; जामनेर – गिरीश महाजन, भाजप; पाचोरा – किशोर पाटील, शिवसेना; भुसावळ – संजय सावकारे, भाजप; मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील, अपक्ष; रावेर – मधुकरराव चौधरी, काँग्रेस अशी दिग्गज मंडळी विजयी झाले आहेत.

Protected Content