जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारक बांधकामाचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते रविवारी २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून पिंप्राळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारक असावे या मागणीसाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यासंच्यासह शिवप्रेमींची मागणी होती होती. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शिवस्मारक होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर केला. त्यानंतर महापालिकेच्या महासभेत शिवस्मारक तयार व्हावे या ठरावाला मंजूरी देण्यात आली. या अनुषंगाने रविवारी २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पिंप्राळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारक बांधकामाच्या भूमीपूजनासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपस्थिती दिली. उध्दव ठाकरे यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले.
येत्या तीन महिन्यात हे शिवस्मारक उभे राहणार असून शिवस्मारक अनावरणाच्या कार्यक्रमाला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवप्रेमी यांना दिले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उध्दव ठाकरे यांचे स्वागत केले. याप्रसंगी ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.