उत्राण येथील निलॉन्स कंपनी दोन दिवसासाठी बंद

 

कासोदा, प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील उत्राण हे गाव कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्युमुळे बंद असल्याने गावातील निलॉन्स कंपनीमध्ये गावातील व परिसरातून येणाऱ्या कामगारांना दोन दिवस म्हणजे दि. २ व ३ मे रोजी सुट्टी देवून कंपनी पूर्ण बंद करण्याचा निर्णय निलॉन्स कंपनीमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आज शनिवार दि. २ मे रोजी दुपारी १२.३० वाजता घेण्यात आलेल्या बैठकीत दोन दिवस कंपनीला सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज कंपनी सकाळी वेळेवर सुरू झाली असल्यामुळे नियोजित बाकी असलेले उर्वरित काम करून कंपनी बंद करण्याचे व्यवस्थापक यांनी सांगितले. सदर निर्णयाबाबत कंपनीचे मालक दिपक संघवी यांच्याशी एरंडोल पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन यांनी बोलून सर्वानुमते निर्णय घेतला. याप्रसंगी कंपनी व्यवस्थापक श्री.चिराग , विशाल कुवर, कार्यकारी सरपंच संतोष कोळी, पोलिस पाटील राजेंद्र महाजन, ग्रामपंचायत सदस्य अमोल महाजन, पत्रकार प्रकाश कूवर व ज्ञानेश्वर महाजन तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Protected Content