उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा l आज सकाळी अफगाणिस्तान – ताजिकिस्तान सीमा प्रदेशात भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत जाणवले.

 

दिल्ली, दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाबसह उत्तर भारतात आज सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. आज सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदूकुश येथे होता. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक भयभीत झाले. भूकंपामुळे तब्बल १५ ते२० सेकंद जमीन हलली.

Protected Content