पुलवामामध्ये दोन दहशतवादी ठार

श्रीनगर : वृत्तसंस्था । काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हाकरीपोरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. या ठिकाणी अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

पुलवामाच्या हाकरीपोरा भागात दोन ते तीन दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानुसार लष्काराची 50 आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त पथकाने परिसरास वेढा दिला व शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. चकमक सुरू झाल्याच्या तासाभरातच या दहशताद्यांचा जवानांकडून खात्मा करण्यात आला.

दरम्यान, या अगोदर दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील मेलहुरा भागात जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. शिवाय, या दहशतवाद्यांकडील एके-47 रायफल व एक पिस्तुल देखील जप्त करण्यात आले होते. काल सायंकाळापासून सुरू असलेली चकमक आज थांबल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा काल सायंकाळीच खात्मा करण्यात आला होता. तर दुसऱ्या एका दहशतवाद्यास आज ठार करण्यात आलं.

Protected Content