यावल तालुक्याला मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पानात रस्ते योजना मिळण्याबाबत निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्याला मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पानात रस्ते योजना मिळावी. तसेच ग्रामपंचायतींना कायमस्वरूमी ग्रामसेवक मिळावा, अशा मागणीचे निवेदन सरपंच परिषदतर्फे गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आले आहे.

या मागणीच्या निवेदनात सरपंच परिषदने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये सरपंचांना कायम स्वरूपी ग्रामसेवक अभावी सर्वसामान्य नागरीकांच्या हिताच्या शासकीय योजना आणि विकास काम होत नसुन गावातील कामे करण्यास अडथळे व अडचणी निर्माण होत आहे. तरी तालुक्यात ग्रामपंचायतींना ग्रामसेवक उपलब्ध करून देणे, अशी मागणी यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

निवेदनावर सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, तालुका उपाध्यक्ष असद सैय्यद जावेद अली, सरपंच परिषदच्या महिला तालुका अध्यक्ष अलका चौधरी, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, डोंगर कठोरा सरपंच नवाज तडवी, वड्री सरपंच अजय भालेराव, नावरे माजी सरपंच समाधान पाटील, भालशिव सरपंच वर्षा कोळी, कोरपावली उपसरपंच हमीदाबी पटेल यांच्यासह सरपंच परिषदचे सदस्य तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

 

Protected Content