यावल पंचायत समितीव्दारे झालेल्या विविध नियमाबाह्य कामांची चौकशी करा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पातळीवरील अनेक गावांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षीत व भोंगळ कारभारामुळे गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन या अभियांनाचा फज्जा उडाला आहे. शासनाचा निधीचा गैरकारभाराच्या विरोधात निळे निशाण सामाजीक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आमरण उपोसण सुरू केले आहे .

निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी या उणेषणा संदर्भात डॉ .मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांच्याकडे दिली असून त्याची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणारी डोंगर कठोरा , पाडळसा, सावखेडा सिम, थोरगव्हाण, वड्री, निमगाव ,गिरडगाव, कासारखेडा, चिंचोली, आडगाव, म्हैसवाडी यासह अनेक गावांमध्ये शासकीय माहीती अनुसार ही गाव मात्र हगणदारी मुक्त झाले असतांना ही तसेच या गावांना सरकारकडून पुरस्कार जाहीर झाले असुन देखील शौचालय बांधकाम करणारे ठेकेदार ग्रामपंचायत मधून काही बोगस ठराव घेऊन ते कामे मंजूर करण्यासाठी खोटे ठराव करून ग्रामसभेत न चर्चा करता हे ठराव मंजूर करीत आहेत. १५व्या वित्त आयोगातून काही जण गावाच्या विकासाची व हिताची कामे रोखून ३०% रकमेची कोणतेही नियोजन न घेता सरपंच ग्रामसेवक ही शासनाची दिशाभूल करीत आहेत स्वतःच्या आर्थिक ठक्केवारीच्या मोहात ठराव न घेता स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी सरकारची दिशाभूल करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे .

सदरच्या या बोगस नियमाबाह्य कामांची जिल्हा पातळीवरून तात्काळ कामे बंद करण्याचे आदेश देवुन तात्काळ संबधीतांवर कार्यवाही करण्यात आवी , तालुका स्तरावरील जेणेकरून कामकाज झालेले कामाचे बिल थांबविण्यात यावीत , शासनाच्या निधीचा अपव्य होणार नाही याची काळजी पंचायत समिती यावल प्रशासनाने घ्यावी व संबंधीतांवर तात्काळ कारवाई तसे न झाल्यास आपण सत्र न्यायालय या संदर्भात अर्ज दाखल करून दाद मागणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी येत्या १० दिवसात आपण संबधीत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे लिखित आश्रासन दिले तरी काही मागण्या या अपुर्ण असल्याने आपले उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषणकर्त अशोक तायडे यांनी म्हटले आहे. याप्रसंगी पंचायत समितीचे पोषण आहार प्रमुख धनके, कृषी अधिकारी डी एस हिवराळे , शिवसेना ( ठाकरे ) गटाचे संतोष धोबी , सारंग बेहडे , पप्पु जोशी , संतोष वाघ यांनी उपोषणाला पाठींबा दिला आहे.

Protected Content