बुलंदशहर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील एका मंदिरात दोन पुजाऱ्यांची गळा कापून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
अनुपशहरच्या हद्दीत येणाऱ्या पगोना गावातील मंदिरातील पुजाऱ्यांची गळा कापून हत्या करण्यात आली असून, मंदिरातील एका खोलीत रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे मृतदेह सापडले आहेत. पुजाऱ्यांच्या हत्येच्या संशयावरुन गावातीलच एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर तरुण आणि मंदिराच्या पुजाऱ्यांमध्ये काही वाद झाला होता. त्यामुळे या घटनेसाठी संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.