अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव ते वाक गावाच्या दरम्यानच्या रोडवरून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले. याप्रकरणी रविवारी १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भडगाव ते वाक गावाच्या दरम्यान वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती भडगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार रविवारी ९ एप्रिल रोजी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास भडगाव पोलीसांनी धडक कारवाई करत वाळूची वाहतूक करणारे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता, त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रक्टर जप्त केले. पोलीस नाईक एकनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात चालक अरूण संजय मोरे (वय-२२) रा. यशवंत नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय जाधव करीत आहे

Protected Content