तीन बैलांचा सुटका; चालकावर पोलीसात गुन्हा दाखल

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर रोडवरून बुलेरो मालवाहू वाहनात तीन बैलांना निर्दयतने बांधून वाहतूक करतांना पारोळा पोलीसांनी पकडले आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पारोळा अमळनेर रोडवरून बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (एमएच ०५ बीएच ७७०५) मध्ये तीन बैलांना कोंबून निर्दयतेने वाहतूक करतांना पारोळा पोलीसांना आढळून आले. याबाबत पोलीसांनी चालक पंकज लखिसिंग राजपूत (वय-२३) रा. वाडी ताजि. धुळे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या वाहनातील तीन बैलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पो.कॉ. किशोर भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक पंकज लखिसिंग राजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पारधी करीत आहे.

Protected Content