अर्थव्यवस्था सावरण्यासाठी हळूहळू लॉक डाऊन शिथिल होणे आवश्यक ; खासदार सुळे

 

मुंबई, वृत्तसेवा । आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी हळूहळू का होईना पण लॉकडाऊन शिथिल झालंच पाहिजे, जितक्या लवकर अनलॉकिंग होईल तितक्या लवकर आपलं राज्य पायावर उभं राहिल, असं मत राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. त्या आज फेसबुकवरून नागरिकांशी संवाद साधत होत्या.

राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करतानाच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरेही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे अनलॉकिंग हळूहळू सुरू झालं पाहिजे हे माझं मत आहे. पण लॉकडाऊन घाईघाईत उठवून चालणार नाही. पण टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवलं पाहिजे. कॅफेमध्ये जाण्यासाठी किंवा मौजमजेसाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केलं पाहिजे, असं सांगतानाच लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत काही सूचना असतील तर अवश्य कळवा, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं.

Protected Content