सचिन वाझेंनीच अंबानीच्या निवासस्थानाबाहेर लावली कार : एनआयए

मुंबई प्रतिनिधी । मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर एपीआय सचिन वाझे यांनीच स्फोटकांनी भरलेली कार लावल्याचा आरोप एनआयएने केला असून याचमुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली कार लावण्यासह या कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात काल रात्री उशीरा एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. प्रारंभी वाझे यांना हिरेने यांच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आल्याचे मानले जात होते. मात्र यासोबतच अंबानी यांच्या निवासस्थाच्या बाहेर आढळून आलेल्या कारच्या प्रकरणात वाझे यांचा थेट सहभाग असून त्यांनीच हे वाहन लावल्याचा गंभीर आरोप एनआयएतर्फे करण्यात आला आहे. याच कारणामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. Sachin Waze parked a car near Mukesh Ambani’s residence : NIA

दरम्यान, सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रसंगी एनआयएतर्फे त्यांची पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Protected Content