पाचोरा, , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज नंदू शेलकर | ईपीएस – ९५ अंतर्गत येणाऱ्या देशातील ६५ लाखाहून अधिक वृद्ध पेंशनर्सची पेंशनवाढ करुन विविध समस्या सोडविण्याबाबत राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ईपीएस – ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे मुख्यालय बुलढाणा येथे दि. २४ डिसेंबर २०१८ पासुन साखळी उपोषण सुरू असुन आज ११४४ वा दिवस आहे. तर दि. १ जुन २०२१ रोजी देशभरातील ६५ लाख ईपीएस – ९५ पेंशनर्सनी कुटुंबासह आप-आपले घरी बसुन १ दिवसीय उपवास आंदोलन करुन आंदोलनाचे फोटो व संदेश प्रशासनास ईमेलद्वारे पाठवुन पेंशनवाढ करण्याची विनंती केली. हे आंदोलन शासनाच्या स्मरणात राहावे म्हणून पेंशनधारकांनी पोस्ट कार्ड पाठवुन समस्या दुर करण्याची मागणी केली होती. मात्र याकडे देखील सरकारने दुर्लक्ष केले आहे. तसेच दि. ४ मार्च २०२० व दि. ५ आॅगस्ट २०२१ रोजी खा. हेमामालिनी यांच्या माध्यमातून समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळासह पेन्शनवाढी संदर्भात दिल्ली येथे केंद्रीय सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावर समस्या गांभीर्यपूर्वक जाणुन घेत पेंशनवाढी संदर्भात सकारात्मक आश्वासन देखील देण्यात आले होते. आश्वासित केल्यानुसार ईपीएस – ९५ पेंशनर्स ला दरमहा ७ हजार ५०० रुपये पेन्शन व महागाई भत्ता देण्यात यावा, पेंशनधारक व त्यांच्या पत्नीला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार रमेश मोरे यांनी स्विकारले. निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आली आहे. निवेदन देते प्रसंगी राष्ट्रीय संघर्ष समितीचे धुळे जिल्हा अध्यक्ष देविसिंग जाधव, धुळे जिल्हा जनरल सेक्रेटरी जगदिश सुर्यवंशी, जळगांव जिल्हा अध्यक्ष अरविंद भारंबे, उपाध्यक्ष रमेश नेमाडे, पाचोरा तालुका अध्यक्ष नंदलाल बोदडे, सचिव दिलीप झोपे, कार्यकारिणी सदस्य कौतिक किरंगे, हरिष प्रेमा आदिवाल, अशोक पाटील, राजेंद्र चव्हाण, पारोळा तालुका अध्यक्ष दिलीप सोळंके सह राष्ट्रीय संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/366395988679171