पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ईपीएस – ९५ अंतर्गत येणाऱ्या वृद्ध पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळत असून त्यांच्या पेन्शनमध्ये वाढविण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारला आ. किशोर पाटील यांच्या मार्फेत करण्यात आली.
ईपीएस – ९५ अंतर्गत येणाऱ्या वृद्ध पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे व आरोग्यासंबंधीत समस्यांमुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे. वारंवार निवेदने व आंदोलने पाठपुरावा करून देखील त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत. या मागण्यांचे निवेदन ईपीएस – ९५ चे ज्येष्ठ नेते अनिल पवार व पाचोरा तालुका अध्यक्ष नंदलाल बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील यांना देण्यात आले. निवेदनात प्रतिमाह ७ हजार ५०० रुपये पेन्शन, महागाई भत्ता व मेडिकल भत्ता आदी मागण्यांचा समावेश होता. याप्रसंगी शहर प्रमुख किशोर बारावकर, विशाल राजपुत तालुका सचिव दिलीप झोपे, सदस्य आर. डी. कोतकर, आर. डी. चव्हाण, अशोक न्हावी, प्रकाश बेंडाळे, विश्वास मराठे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत आ. किशोर पाटील यांनी सकारात्मक आश्वासन देत पेंशनर्स यांच्या समस्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सह संबंधित विभागाचे मंत्री यांच्यापर्यंत पोहचवुन मागण्या लवकरात लवकर सोडविण्याबाबत आश्वासन दिले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/478158234085740