चोपडा, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार अरुणाताई बाविस्कर यांनी आज (दि.४) उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे यांच्याकडे दाखल केला.
यावेळी त्यांच्यासमवेत चर्मकार युवा जिल्हाध्यक्ष विनोद खजुरे, अशोक बाविस्कर, समाधान सपकाळे, कृष्णा सोनवणे, महेंद्र वाडे, निलेश भालेराव, भरत सोनवणे, सुनील भालेराव, अविनाश बाविस्कर, डॉ. नवल मराठे, बापू बाविस्कर, जियाउद्दिन काजी, पौर्णिमा सोनवणे, कलाबाई वाडे, लताबाई वाडे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.