इंजिनिअर अन् एमबीए झालेले तरुण करताय पार्कींग अटेंडंटचे काम !

चेन्नई (वृत्तसंस्था) चेन्नई कॉर्पोरेनसाठी नोकरभरती करणाऱ्या एजन्सीने जवळपास ५० इंजिनिअर आणि एबीएधारक तरुणांना पार्कींग अटेंडंटच्या कामावर रुजू केले आहे.

 

चेन्नई कॉर्पोरेशनच्या स्मार्ट कार पार्किंगसाठी बनविण्यात आलेल्या अॅपसाठीच्या चेन्नई कॉर्पोरेनसाठी नोकरभरती करणाऱ्या एजन्सीने जवळपास ५० इंजिनिअर आणि एबीएधारक तरुणांना कामावर रुजू केले आहे. या कामासाठी अवघ्या १० पासची पात्रता होती. या नोकरीवर काम करणाऱ्याने आदित्यने प्रतिक्रिया देतांना सांगितले की, दहावी पास विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान शिकायला ४ ते ५ तास लागतात. मात्र, आम्ही केवळ २ ते ३ मिनिटांत शिकून घेतो. तर, एमबीएची पदवी धारण केलेल्या आणि २१ वर्षांचा अनुभव असलेल्या राजेश यांनेही येथे टीम लिडर म्हणून नोकरी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कंपनीत मिळणाऱ्या पगाराच्या 55 टक्के कमी पगारात राजेशने इथे ज्वॉईन केले आहे. मला सहा वर्षाचा मुलगा आहे. तसेच कुटुंबात कमावणारे एकटाच असल्यामुळे मला नोकरीची गरज आहे, म्हणून मी ही नोकरी करत असल्याचे राजेशने सांगितले.

Protected Content