ढोल ताशांच्या गजरात जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात जागतिक आदिवासी गौरव दिन माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत आदिवासी बंधू भगिनींच्या गर्दीत अलोट मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

प्रारंभी शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात क्रांतिवीर,महापुरुष,राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी आयोजक संजीव शिरसाठ,प्रांत अधिकारी सिमा आहिरे, तहसिलदार अनिल गावित यांची खास उपस्थिती होती. छत्रपती राजे शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण केले नंतर आदिवासी विद्यार्थीनींच्या लेझिम ठेक्यावर व अमळनेरच्या काठी पटू विद्यार्थ्यांच्या कसबी खेळांनी अन् आदिवासी बांधवांच्या नयनरम्य नृत्याने रंगतदार रॅलीस प्रारंभ झाला. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

या प्रचंड रॅलीचे नेतृत्व आदिवासी सेवक संजय शिरसाठ (अध्यक्ष आदिवासी बहु.उद्देशीय संस्था),गणदास बारेला, प्रताप पावरा,देवसिंग पावरा,खुमसिंग बारेला, बियाणू बालेला, डॉ अनिल पावरा, यासु बारेला, बिराम बारेला, ईदा बारेला, तितऱ्या बारेला, नगरसेवक महेंद्र धनगर, शिवसेना शहरप्रमुख दीपक चौधरी,पत्रकार महेश शिरसाठ, सुकलाल कोळी,सौ नायजाबाई पावरा, नका बारेला, नर्साबाई पावरा,सौ.नानीबाई पावरा,सौ.बाटीबाई पावरा,सौ.सकुबाई बारेला,प्रताप बारेला, उमाबाई बारेला, खेलसिंग बारेला, निर्मला बारेला, संजू पावरा पानशेवडी, विनेश पावरा, मालापुर, ,पी आर माळी, सचिन महाजन, उदयभान ईगळे, गुलाब ठाकरे,नंदु शिरसाठ, प्रताप बारेला,खेलसिंग बारेला, करण शेवाळे,नामसिंग पावरा, गजिराम पावरा,अनिल भिल, गुडा पावरा,जतनसिंग पावरा,सायराम बारेला, सुरेश बारेला,जया बारेला, सुरेश बारेला,बालसिंग बारेला, कमलेश बारेला,राजेश बारेला,गजिराम बारेला, मयुर बारेला, रामसिंग पावरा, सुनिल भिल, जगदिश बारेला, राजेश बारेला, बालसिंग बारेला,गेलसिंग बारेला, भरतं देवराज, पंडित शिरसाठ,भिमा पावरा,सौ नर्साबाई पावरा, नानीबाई पावरा, सुनिल शिरसाठ, रामचंद्र कोळी , ईश्वर कोळी आदिवासी एकलव्यचे राजेश पवार साकळी,बिराम बारेला मनापुरी,यासु बारेला सरपंच अडावद ,मधुकर भिल आदर्श सोनवणे वनगाव पांढरी वस्ती, गणदास बारेला, शेवरेपाडा, नामसिंग पावरा, मयुर बारेला, संजय बारेला , आझाद सेनेचे दिगंबर सोनवणे,यांनी केले. पावरा,बारेला,भिल्ल,कोळी, तडवी,पारधी जमातीतील आदिवासींनी ऐकोपा ठेवत प्रचंड संख्येने सहभाग घेतला.

पारंपारिक वेशभूषेत, ढोल ताशे व आदिवासी नृत्य हे या रॅलीचे खास आकर्षण ठरले त्यात आदिवासी विद्यार्थीनींनी लेझिम ठेक्यावर नृत्य करत रंगत आणली शासकिय विश्रामगृह, समिती छ.शिवाजी महाराज चौक मेनरोड गांधी चौक मार्गे थाळनेर दरवाजा ते पोलीस ग्राऊंडवर समारोप झाला.

 

Protected Content