डॉ. कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्यज वाटप

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमृत ​​महोत्सवानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तथा आश्नय फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या वतीने मोफत राष्ट्रध्वज वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे.

यावल येथील भाजपाच्या तालुका संपर्क कार्यालयात दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ मंगळवार रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने यावल येथील माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय ध्यज तिरंगा वाटप करण्यात सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी हिरालाल चौधरी यांच्या हस्ते ध्यज वितरण करून या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला सर्वत्र उदंड असा प्रतिसाद मिळतोय यात यावल तालुका हा तिळभर ही मागे राहणार नाही असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे . या अभीयानास मोठया प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी डॉ. कुंदन फेगडे यांनी मोफत राष्ट्रीय ध्यज तिरंगा वाटप करीत आहे.

या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष . हिरालाल चौधरी भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, माजी उपसभापती पं. स दिपक आण्णा पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उजैनसिंग राजपूत, विलास चौधरी, भाजयुमो जिल्हा ग्रामीण सरचिटणीस राकेश फेगडे, भाजपा ओ.बी.सी. सेलचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, यावल शहर अध्यक्ष डॉ निलेश गडे, उदय बाविस्कर, सलीम तडवी , अतुल भालेराव ,भूषण फेगडे, रितेश बारी, स्नेहल फिरके, परिष नाईक. मनोज बारी आदींची उपस्थिती होती

 

Protected Content