जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय बाल निरीक्षण गृहातील मुलींसाठी १२ दिवसांचे ” इंग्रजी- मुलभूत व्याकरण” या कार्यशाळेचे आयोजन डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभाग व एक्स्टेन्शन ॲक्टिविटी समिती यांच्या संयुक्त विदयमाने करण्यात आले.
बाल सुधार गृहात विविध कारणांनी अनेक मुली येतात ह्या मुलींनीही इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळावे, स्पर्धात्मक युगात त्यांना इंग्रजी भाषा सहज बोलता, लिहिता, वाचता यावं यासाठी डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला विद्यालयामार्फत ” इंग्रजी- मुलभूत व्याकरण” या विषयावर 12 दिवस कार्यशाळाचे अनोखं आयोजन केलं आहे.
या कार्यशाळेत निरीक्षण गृहातील मुलींना इंग्रजी व्याकरणातील मुलभूत संकल्पना व इंग्रजी भाषेचा व्यवहारिक उपयोग या बाबतीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी निरिक्षण गृहाच्या अधीक्षक मा. जयश्री पाटील, बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे , एक्स्टेन्शन ॲक्टिविटी समिती समन्वयक डॉ. दीपक किनगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेची आज सुरुवात झाली.
या कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. सविता नंदनवार , महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. मिताली अहिरे, प्रा.योगिता सोनवणे,प्रा. नयना मराठे व प्रा. पूजा टाक यांच्या सहकार्यातून या १२ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.