आ. राजासिंह यांना सुरक्षा प्रदान करा; हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना सुरक्षा प्रदान करावी या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने यावल येथील नायब तहसीलदार संतोष विनंते यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. त्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात आमदार टी.. राजासिंह यांना पुन्हा २५ ऑगस्ट रोजी करण्यात आली. एकूणच या प्रकरणात आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्रास दिला जात आहे. आता तर त्यांच्यावर ‘पी.डी. अॅक्ट’ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना किमान एक वर्ष जेलमध्ये अडकवून ठेवण्याचा भयंकर कट रचण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यापूर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच ‘सर तन से जुदा’ सारख्या प्रक्षोभक आणि जीवे मारण्याच्या घोषणा देत हिंसक आंदोलने केली जात आहेत. यासाठी आमदार राजासिंह याना त्वरित सशस्त्र सुरक्षा प्रदान करण्यात यावी आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या धर्मांधांवर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावल येथील नायब तहसीलदार संतोष विनंते याना देण्यात आले.

या निवेदनाच्या माध्यमातून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
1. तेलंगणा राज्यातील जिहादी प्रवृत्तीचे आमदार, पदाधिकारी यांच्याकडून थेट कायदा हातात घेण्याची चिथावणी दिली
जात असतांना तेलंगाणा पोलीस त्यांच्यावर कारवाई करतांना दिसत नाहीत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडवू पहाणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधींवर, तसेच त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी.
2. तेलंगाणामध्ये ‘तेलंगाणा राष्ट्र समिती चे सरकार असून ते अल्पसंख्यांकधार्जिणे आणि त्यांचे लांगूलचालन करणारे आहे. तेलंगाणा सरकार हे पक्षपातीपणाने वागत आहेत. त्यामुळे राज्यात हिंसाचार करणाऱ्यांना पोलिसांनी सोडून दिल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणखी बिघडू शकते. त्यामुळे केंद्रीय गृह खात्याने यामध्ये लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी.
3. टी. राजासिंह यांना तेलंगाणा सरकारकडून न्याय मिळेल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांरित करावेत..
4. टी. राजासिंह यांना ज्या तुरुंगात ठेवले आहे, तेथे आधीपासूनच जिहादी आतंकवाद्यांनादेखील ठेवलेले आहे. या तुरुंगात टी. राजासिंह यांच्या जीवाला धोका आहे. तरी त्यांना सुरक्षित तुरुंगात हलवण्यात यावे.
5. टी. राजासिंह यांच्यावर जुन्या प्रकरणाचे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा कुटील डाव रचला जात आहे. त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा.

Protected Content