बिगुल फुंकला : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातल्या १८ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे.

राज्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. येत्या ऑक्टोबर महित्यात १८ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे यंदा थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांबाबत आज राज्याचे निवडणूक आयुक्ती युपीएस मदान यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यू.पीएस मदान यांनी याबाबत सांगितले की, संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबर २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय असल्याची माहिती मदान यांनी दिली आहे.

ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या

ठाणे

कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, व शहापूर- ७९. पालघर: डहाणू- ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११ व वाडा- ७०.

रायगड

अलिबाग- ३, कर्जत- २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३ व श्रीवर्धन- १. रत्नागिरी: मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३

रत्नागिरी- ४, लांजा- १५ व राजापूर- १०

सिंधुदुर्ग

दोडामार्ग- २ व देवडगड- २

नाशिक

इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१, त्र्यंबकेश्वर- ५७ व पेठ- ७१

नंदुरबार

अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५ व नवापूर- ८१

पुणे

मुळशी- १ व मावळ- १

भंडारा

तुमसर-१, भंडारा-१६, पवणी-२ व साकोली-१.

गोंदिया

देवरी-१, गोरेगाव-१, गोंदिया-१, सडक अर्जुनी-१ व अर्जुनी मोर-२

गडचिरोली

चामोर्शी-२, आहेरी-२, धानोरा-६, भामरागड-४, देसाईगंज-२, आरमोरी-२, एटापल्ली-२ व गडचिरोली-१.

सातारा

जावळी- ५, पाटण- ५ व महाबळेश्वर- 6

कोल्हापूर

भुदरगड-१, राधानगरी-१, आजरा-१ व चंदगड-१

अमरावती

चिखलदरा-१

वाशीम- १

नागपूर: रामटेक- ३, भिवापूर- ६ व कुही- ८.

वर्धा: वर्धा- २ व आर्वी- ७

चंद्रपूर

भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३० व ब्रह्मपुरी- १.

Protected Content