आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी रस्त्यांसाठी १५.९२ कोटींचा निधी !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दुसर्‍या टप्प्याच्या अंतर्गत मुक्ताईनगर मतदारसंघासाठी तब्बल १५.९२ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ ,संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन ,ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांकः मुग्रायो-२०२३/प्र.क्र. ४४२ / बांधकाम-४ बांधकाम भवन, ५ वा मजला, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई- ४००००१ दिनांक : ०२ जून २०२३ अन्वये परिपत्रक जाहीर झालेले आहे.

 

यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार व केलेल्या पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगर मतदार संघासाठी सुमारे १५.९२ कोटी रुपये मंजूर झालेले आहे. यात प्रामुख्याने रावेर , बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील सुमारे २१ किमी लांबीचे ६ प्रमुख रस्ते होणार आहेत. अशी माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.

खालील नमुद नाव, लांबी व अंदाजित रकेमसह महत्त्वाचे रस्ते मंजूर झालेले आहेत.

१) राम ०४- भारतेश्वर मंदीर ते रामा -४५ ०/००० ते ३/२६०) (ढठ ०३, तठ ( कोचुर ) रस्ता ( सा.क्र.२७) ता.रावेर (लांबी ३.२५० किमी) (२७५.८३ लक्ष)

 

 

२)थोरगव्हाण ( प्रजिमा – १५) ते तासखेडा रणगाव रस्ता (सा. क्र. ०/००० ते ३/५०० ) (चठङ- १४ तठ ६८, जऊठ १९ ) ता.रावेर (लांबी ३.५०० किमी) (२६२.३९ लक्ष)

 

 

३) रामा ४७- कुह- काकोडा पारंबी – ते मोरझिरा रस्ता ( भाग लांबी- पारंबी ते राजोरा हिवरा ) ( सा.क्र. ०/००० ते ३/००० ) ( ढठ- ०७तठ – ०२, ४३, ११९) (लांबी ३.००० किमी) (२४५.६८ लक्ष)

 

४)रामा ४७ ते वडगाव रस्ता (साखळी क्र. ०/००० ते २/७०० (ङठ-०९, तठ ८५)(लांबी २.७००किमी) (२२७.०१ लक्ष)

 

५)तालुका हद्द ते जलचक्र खु रस्ता ( भाग लांबी तालुका हद्द ते सुरवाडे खु) ( सा.क्र. ०/००० ते ६/००० ) ( ङठ१८.तठ २५) (लांबी६.००० किमी) (४४९.६७ लक्ष)

 

करंजी ते ( पिंपळगाव बु तालुका हद्द रस्ता ( भाग लांबी करंजी ते पिंपळगाव खु ) ( सा.क्र. ०/००० ते १/८०० ) (चठङ ०६ जऊठ २९ ) (लांबी १.८०० किमी) (१३४.९५ लक्ष)

Protected Content