भुजबळ फार्मवर शांतीगिरी महाराज छगन भुजबळ यांच्या भेटीला

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्वामी शांतीगिरी महाराज हे छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्मवर भेट घेणार आहे. याआधी त्यांनी भाजपचे नेते दिनकर पाटील यांची सुध्दा भेट घेतली आहे. प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज यांनी दिनकर पाटील यांची घरी भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली. अपक्ष उमेदवार महायुतीच्या नेत्याची भेट घेणार असल्याने हा विषय चर्चेचा ठरत आहे. शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते. मात्र महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर महायुतीने शांतीगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र शांतीगिरी महाराज हे निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने हेमंत गोडसेयांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांनी उमेदवारी दिली आहे. तसेच शांतीगिरी महाराज हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रीत आहे.

Protected Content