जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीपेठेतील ऑर्कीड हॉस्पिटलसमोरून आसोदा येथील तरूणाची दुचाकी लांबविल्याची घटना गुरूवारी घडली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, स्वप्निल जानकीराम चौधरी (वय-२९) रा. माळीवाडा आसोदा हे हातमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामानिमित्त २८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहरातील नवीपेठेतील ऑर्किड हॉस्पिटल जवळ आले. हॉस्पिटलसमोरील भिंतीजवळ त्यांनी त्यांची (एमएच १९ बीई १९३५) क्रमांकाची दुचाकी लावली. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत दुचाकी चोरून नेली. परिसरात शोधाशोध सुरू केली दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.