फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरूवारी हिंदू धर्माचा सण आषाढी एकादशी व मुस्लिम समाजाचा बकरी ईद सण एकाच दिवशी असल्याने फैजपूर येथे हिंदू समाजाला त्रास न होणेसाठी मुस्लिम समाजाने त्यांचा कुर्बानी चा कार्यक्रम रद्द केला आहे.
फैजपूर शहरात हिंदू – मुस्लिम समाजाचा एकोपा, एकजूट रहावी व शांतता प्रस्थापित होणेसाठी मुस्लिम समाजाने शहरातील हजीरा मोहल्ला, मदार वाडा, मण्यार वाडा, पिंजार वाडा, बडा मोहल्ला, पठाण वाडी, कुरेशी मोहल्ला, मिल्लत नगर अशा विविध भागात बैठका घेऊन हिंदू समाजाचा सण सर्वात मोठी आषाढी एकादशी असल्याने उद्याची कुर्बानी चा कार्यक्रम रद्द करावा, असे मौलाना अनस, जफर मेंबर, कलीम मण्यार, जलील मेम्बर, कुर्बान मेम्बर, डॉ अब्दुल जलील, अन्वर खाटीक, फारूक अब्दुल्ला, इस्माईल खान सह शहरातील मौलाना व फैजपूर मुस्लिम ईदगाह पंच कमिटी यांनी बैठक घेऊन सर्वानी ठरविला.