छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेच्या माध्यमातून १८ तरुण नोकरीसाठी परदेशात रवाना

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यातील १८ तरुणांना छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेच्या माध्यमातून विदेशात नोकरीसाठी रवाना झाले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण केव्हा मिळेल? मिळेल की नाही? अशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याने मराठा समाजातील नैराश्यात गेलेल्या उच्च सुशिक्षीत युवकांना सावरण्यासाठी छत्रपती मराठा साम्राज्य ही संघटनेने पुढाकार घेतला आहे. यानुसार २२ जून रोजी एकाच दिवशी तब्बल १८ तरुण युरोप क्रोटीया येथे नोकरीसाठी रवाना झाले आहे.

समाजाची आर्थिक शैक्षणिक प्रगती करायची असेल तर एकत्र येऊन एकमेकांना मदत करण्याशिवाय पर्याय नाही. या उद्देशाने स्थापन झालेल्या छत्रपती मराठा साम्राज्य या संघटनेचे सर्वसमावेशक काम सुरु असून शिव छत्रपतींच्या आदर्श मुल्यावर चालणाऱ्या सीएमस संघटनेत आतापर्यंत पन्नास हजार समाज सहभागी झाले असून इतर समाज बांधवानीही या समाज कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन छत्रपती मराठा साम्राज्यचे संचालक धनराज भोसले, जितेंद्र पवार, ओंकार देशमुख ह्यांनी केले आहे.

सीएमस ही अशी पहिलीच संघटना आहे की ज्यांचे १८ बांधव एकाच दिवशी जाॅबसाठी एकाच ठिकाणी विदेशात रवाना झाले आहेत. समाजकार्य करत असताना एकाच वेळीं १८ युवकांना परदेशात नोकरीसाठी पाठवण्याचा मान ” सीएमस छत्रपती मराठा साम्राज्य” या संघटनेला मिळवून देण्यात जितेंद्र पवार, संदेश जुवेकर यांनी फेब्रुवारी २०२२ ते जून २०२२पर्यंत विशेष मेहनत घेतली.

Protected Content