ट्विट करत मनसे आमदाराचा शिवसेनेवर हल्लाबोल !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेनेचे ४१ आमदार व १२ खासंदारांना घेवून गुवाहटी येथे दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भागदड पडल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाली आहे. त्यावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

 

महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. या सर्व घडोमोडींवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर टिका करून हल्लाबोल केला आहे.

 

“अशी कशी फुटून गेली वाघाची छाती,”

“कारण द्यायचं ‘हिंदुत्व’, खरंतर ‘ईडी’काडीची भीती.”

 

“‘गद्दारांना क्षमा नाही’ ऐकलं होतं ठाण्यात,”

“४६ जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात.”

 

असे म्हणत राजू पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. याचबरोबर, याआधी केलेल्या एका ट्विटमध्ये राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या विधानाची देखील खिल्ली उडवली आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!