वाघुलखेडा परिसरात रानडूकरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

पाचोरा प्रतिनिधी । वाघुलखेडा परिसरासह तालुक्यात रानडुकरांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रानडुकरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

तालुक्यातील वाघुलखेडा परिसरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात राण डुकरांचा वावर आहे. ही रानडुकरे रात्रीच्या वेळी शेतात प्रवेश करून पिकांचे नुकसान करत आहे. तसेच या रानडुकरांनी अनेकांना किरकोळ जखमी केल्याच्या घटना ही घडल्या आहेत. तालुक्यातील वाघुलखेडा येथील रहिवाशी शंकर विठ्ठल पाटील यांचे गट नं. ७२/२ या बागायत क्षेत्रात त्यांनी ० . ८० आर मका पेरलेला असुन यापैकी ६० टक्के मका पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले असुन ऐन काढणीला आलेला मक्याचे नुकसान झाल्याने शंकर पाटील हे हवालदिल झाले आहे.  शंकर पाटील यांनी दि. २३ फेब्रुवारी रोजी वन विभागाला पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी याबाबत अर्ज दाखल केला आहे. परंतु आज २० दिवस होवुनही कुठलीच कारवाई होत नसल्याने याबाबत वन विभागाने लक्ष देवुन नुकसान भरपाई मिळवुन द्यावी, अशी मागणी शेतकरी शंकर पाटील यांनी केली आहे.

Protected Content